पिंपरी चिंचवडशिक्षण

श्रावणी टोनगे हिने ssc बोर्डाच्या परीक्षेत उतुंग भरारी मारली

. श्रावणी टोणगे पिंपरी चिंचवडचा अभिमान..

Spread the love

पिंपरी चिंचवडला अभिमानास्पद कामगिरी

 पिंपरी (लोकजागृती )पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी येथील छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थिनी कु. श्रावणी टोनगे हिने ssc बोर्डाच्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले आहे.

श्रावणीची निवड थेट जर्मनीतील प्रतिष्ठित युनायटेड वर्ल्ड कॉलेज (UWC) – रॉबर्ट बॉश महाविद्यालय येथे झाली असून, तब्बल एक कोटी रुपयांची स्कॉलरशिप तीने मिळवली आहे..

अशी अभिमानास्पद कामगिरी करणारी ती महाराष्ट्रातील पाहिली विद्यार्थिनी आहे. ही केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरासाठी अभिमानाची बाब आहे.

नुकतीच महापालिका आयुक्त मा. शेखर सिंह यांनी स्वतः भर पावसात श्रावणीच्या कासारवाडी येथील घरी भेट देत तिचे कौतुक केले व तिला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

श्रावणीचे हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.. तिचे, तिच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन.. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button