पिंपरी चिंचवडसामाजिक

रविभाऊ लांडगे यांचा अभिष्टचिंतन सोहळा भोसरी येथे उत्साहात 

Spread the love

पिंपरी (लोकजागृती )भोसरीतील सेक्टर १ इंद्रायणी नगर भोसरी येथे पिंपरी चिंचवड शहराचे एक युवा नेते बिनविरोध नगरसेवक माननीय रविभाऊ लांडगे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास राजकीय सामाजिक शैक्षणिक अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली यात विशेषतः मोशी, चरोली, दिघी, चिखली, नेहरूनगर, शाहूनगर, भोसरी परिसरातील आजी माझी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते हितचिंतक यांनी उपस्थिती दर्शवून पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या कर्नाटक राज्यातील विधान परिषदेचे आमदार माननीय मारुती रावजी मुळे यांनी पण शुभेच्छा दिल्या, १० ऑगस्ट ते १८ऑगस्ट या कालखंडामध्ये गोशाळेमध्ये चारा वाटप, अनाथ मुलांना अन्नदान वाटप, शालेय साहित्य वाटप, कराटे स्पर्धा, महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा क्रांती नाना मळेगावकर यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

हजारोंच्या संख्येने महिलांनी या कार्यक्रमात सहभाग दर्शवला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा नेते राहुल लांडगे, युवा नेते प्रकाश लांडगे, प्रवीण लांडगे रवींद्र नाना लांडगे, अमित जी लांडगे, आनंद ग्रुप उद्योग समूह, कै. अंकुशराय लांडगे प्रतिष्ठान, रवी भाऊ लांडगे मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button