पिंपरी चिंचवड

ॲड. संजय माने व शिलचंद्र हजगुडे यांची धर्मवीर संभाजी बँकेच्या तज्ञ संचालक पदी निवड 

Spread the love

 

पिंपरी, पुणे (दि. २८ जुलै २०२५) पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित आणि रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या धर्मवीर संभाजी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या तज्ञ संचालक पदावर ॲड. संजय गणपत माने आणि शिलचंद्र हसगुडे यांची पुढील एक वर्षासाठी नेमणूक करण्यात आली आहे. बँकेचे अध्यक्ष बाबुराव शितोळे यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत ॲड. माने व हजगुडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. ॲड. संजय माने हे अनुभवी पत्रकार असून सातारा येथील जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कासपठार च्या कार्यकारी समितीचे आणि शहरातील अनेक सहकारी सोसायट्यांचे व गृहनिर्माण सोसायट्यांचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. शिलचंद्र हजगुडे हे नामांकित सनदी लेखापाल आहेत अशी माहिती सर व्यवस्थापक कालिदास सुतार (प्र) यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

Oplus_131072

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button