पिंपरी चिंचवड

झोपडपट्टीतील नागरिकांना विकास कामे दुबार घरे देण्याचा प्रकार सतत निर्दशनात आला:आमदार उमाताई खापरे

Spread the love

लोकजागृती पिंपरी :पिंपरी चिंचवड शहरातील मिलिंद नगर या ठिकाणी सन २००९ या वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय हाऊसिंग सोसायटीचे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्टी धारकांना पुनर्वसन प्रकल्प उभारताना घरे बांधून देण्यात आले.

मात्र या ठिकाणी दुसरा टप्प्याचे पुनर्वसनाचे काम सुरू असतानाही पुन्हा मिलिंद नगर झोपडपट्टीतील त्याच नागरिकांना विकास कामे दुबार घरी देण्याचा प्रकार सतत निर्दशनात येत आहे.

याबाबत अनेक नागरिकांनी दुबार घर धारकांची तक्रार प्रशासनाकडे करून या तक्रारीची दखल प्रशासनाने न घेतल्याने ते घरापासून वंचित राहत आहेत.असे  उमा ताई खापरे यांनी  सभागृहात मागणी केली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत देण्यात येणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील पुनर्वसनाच्या प्रकल्पामध्ये विकास कामे केलेल्या कामाची सखोल चौकशी करून दुबार झोपडीधारकांची नावे रद्द करून देण्याकरिता सूचना सभागृहात उपस्थित केला.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button