महाराष्ट्रशिरूर

शिरूर टाकळी हाजी येथेआदिवासी पारधी समाजाची मालकी हक्काची जमीन बळकावली

Spread the love

 

पिंपरी :लोकजागृती आदिवासी पारधी समाजातील काळे कुटुंबीयांची मालकी हक्काची वहिवाटीची जमीन गट नंबर ९७८ होनेवाडी टाकळी हाजी तालुका शिरूर या ठिकाणी आहे. त्या ठिकाणचे बाजूचे मातब्बर खाडे हे, काळे कुटुंबीय,पारधी समाजावर जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देऊन अन्याय अत्याचार करणारे इसम नामे – विकास प्रभाकर खाडे, भरत प्रभाकर खाडे, प्रभाकर सोनबा खाडे, हौसाबाई प्रभाकर खाडे, राहणार घोडे वस्ती होनेवाडी टाकळी हाजी तालुका शिरूर. हे मातब्बर खाडे कुटुंबीय त्या ठिकाणी भालचंद्र भिवा काळे यांच्यासह सर्व कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्या ठिकाणी कॅनॉलच्या बाजूस असलेली जमीन बळकवली आहे.कारण त्या ठिकाणी हे समाजकंटक खाडे कुटुंबीयांनी मातीचे डबर आणून टाकलेले आहे. या ठिकाणी जेसीबी जो आणलेला आहे त्या जेसीबीला चारही बाजूने पाहिले तर नंबर प्लेट सुद्धा नाही,बोरीचे व लिंबाचे असे चार ते पाच झाडे त्यांनी मुळासहित जेसीबीने उपटून जमीनदोस्त करून टाकलेले आहे. हे काळे कुटुंबीय अशिक्षित असल्याने त्यांच्यावर अन्याय अत्याचार करून सुद्धा हे लोक त्यांच्याआधीच संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन काळे कुटुंबीयांना पोलिसांमार्फत दमदाटी करण्याचा प्रयत्नही या ठिकाणी करण्यात आलेला आहे. सदर ठिकाणी पाहणी केली असता त्या ठिकाणी या काळे कुटुंबियांना इथे दिसले तर तुमचे हातपाय तोडले जातील तुमचं काय असेल ते कॅनलच्या खाली बघायचं वरती आले तर तुम्हाला जीवे मारायला सुद्धा आम्ही पुढे मागे बघणार नाही हे लक्षात घ्या आणि भरत प्रभाकर खाडे यांनी मी वकील आहे माझे काही वाकडे होत नाही काय करायचं ते करून घ्या अशी धमकी देऊन व महिलांसहित अंगावर धावून येतात त्या ठिकाणी मुजोर असलेल्या खाडे कुटुंबीयांनी आदिवासी पारधी समाजावर अन्याय करण्याचा घाट घातला आहे. यानंतर त्या ठिकाणी काही पत्रकार बांधव गेले असताना त्या ठिकाणची व्हिडिओ शूटिंग आणि काळे कुटुंबियांची(व्हिडिओ) घेत असताना त्या ठिकाणी खाडे यांचा ट्रॅक्टर शेतीचे काम उरकून संध्याकाळच्या वेळी सुमारे ६.४५ वाजता निघाले असता त्या ठिकाणी काळे कुटुंब आणि काही सामाजिक कार्यकर्ते सदर ठिकाणी होते त्यांना बघताच खाडे हे ट्रॅक्टर थांबून खाली उतरले आणि काळे कुटुंबियातील काही सदस्यांना शिवीगाळ करण्याच्या किंवा मारहाण करण्याच्या तयारीने खाली उतरले असता त्यांना त्यांच्या पत्नी हौसाबाई खाडे यांनी आवरले व आता सध्या त्यांची लोक या ठिकाणी आलेले आहेत आता आपण यांना नंतर बघू आता घरी चला आपले “पोरं,, आल्यावर त्यांच्याकडे आपण उद्या बघू आता करू द्या यांना काय करायचे कोणाला बोलायचे बोलू द्या असे बोलून त्यांनी तिथून ट्रॅक्टर निघून गेला.

हा सर्व प्रकार सदर ठिकाणी उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते किसन भोसले व बीके भालेराव यांनी स्वतः पाहिला यानंतर दुसऱ्या दिवशी काळे यांना वनपरिक्षेत्र अधिकारी शिरूर यांच्याकडे तक्रार करण्यास गेले असता त्या ठिकाणीही खाडे यांचा मुलगा त्या ठिकाणी भालचंद्र काळे यांच्या जाण्याआधीच उपस्थित होता. यानंतर उपनिरीक्षक भूमिअभिलेख यांना भालचंद्र काळे यांनी निवेदन दिले आहे. या निवेदनावर जर संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी शिरूर व भूमी अभिलेख उपनिरीक्षक यांनी काही कारवाई केली नाही तर याविषयी आदिवासी पारधी समाज सुरक्षा दल या संघटनेच्या वतीने जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत जोरदार आंदोलन करण्यात येणार आहे. असे येथील कार्यकर्ते आंदोलना विषयी माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button