कलापिंपरी चिंचवडमहाराष्ट्रशिक्षण

युनिक व्हिजन इंग्लिश मिडियम स्कूल चिंचवड तर्फे अनाथाचा नाथ पांडूरंगा च्या पालखीचे स्वागत आनंद उत्सव !

विद्यार्थ्यांनी हरिनामाच्या जय घोष!

Spread the love

देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई  युनिक व्हिजन इंग्लिश मिडियम स्कूल चिंचवड तर्फे अनाथाचा नाथ पांडूरंग हा उपक्रम व आनंदवारी जल्लोषात साजरी

पिंपरी चिंचवड :लोकजागृती राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी असा टाळांचा जयघोष करत युनिक व्हिजन इंग्लिश मिडियम स्कूल च्या प्रांगणात आषाढी एकादशीच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. ३५० वर्षापासूनची दिंडी परंपरा समजण्यासाठी नर्सरी, प्रायमरी, १ ली ते १० वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी हरिनामाच्या जयघोषात माऊलीच्या पाद्यपूजनाने आनंदवारीला उत्साहात सुरुवात झाली.

विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम, संत गोराकुंभार,पुंडलिक तसेच निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशा विविध संत व वारकरी वेशभूषा केल्या व आपल्या संत पंरपरेचा वारसा जपला. यावेळी शाळेच्या संचालिका अश्विनीताई चिंचवडे व केअरिंग हॅन्डस् चे विश्वस्त शैलेन्द्र मसलेकर यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले.

शाळेच्या इ १ वी ते १० वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी धान्य जमा करून “केअरिंग हॅन्डस् या संस्थेला भेट स्वरुपात दिले. व “अनाथाचा नाथ पांडूरंग” हा उपक्रम राबविला. इ.४ थी व इ.६ वी च्या विद्यार्थ्यांनी पालखी रिंगण व पावले टाळांच्या गजरात सादर केली तसेच इ.८ वी च्या विद्यार्थ्यांनी भारूड, अभंग सादर केले.यावेळी बालाजी कुलकर्णी सर यांनी विद्यार्थ्यांना आषाढी वारीचे महत्व सांगितले तर शाळेतील शिक्षिका सौ. कोमल सातपुते, सौ.कमल पावसे व सरिता राहाटे यांनी ओवीचे सादरीकरण केले.तसेच आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला.

सौ. सुप्रिया दिवाकर, सौ.प्रियांका गोडसे, सौ.सरिता राहाटे, सौ.राजश्री शेळके यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी शाळेच्या संचालिका अश्विनीताई चिंचवडे, मुख्याध्यापिका सौ. रजनी भंगाळे, अध्यक्ष ऋषीकेश चिंचवडे सर, तसेच सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी सहभागी झाले होते. विठल नामाच्या गजराने व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button