पिंपरी चिंचवडउद्योग विश्वकला

गुलकंद सिनेमाच्या कलाकारांसोबत  चिंचवडला आज दिलखुलास गप्पा

प्रसाद ओक, समीर चौघुले, सई ताम्हणकर,  ईशा डे, मोटे, गोस्वामी यांची उपस्थिती

Spread the love

 

पिंपरी (लोकजागृती )जगभरातील मराठी माणसाच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या `महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या सर्वाधिक लोकप्रिय मालिकेच्या टीमसोबत अर्थात गुलकंद सिनेमाच्या कलाकारांसोबत दिलखुलास संवाद साधण्याचा कार्यक्रम दिशा सोशल फाऊंडेशनने आज, सोमवारी (२८ एप्रिल) आयोजित केला आहे.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश असून काही जागा राखीव आहेत. प्रथम येईल, त्यास प्राधान्याने प्रवेश दिला जाणार आहे. वेळेवर स्थानापन्न होण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा ही सोनी मराठीवरील मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. लेखक सचिन मोटे आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी या प्रसिध्द जोडीच्या वेटक्लाऊड प्रॉडक्शनच्या वतीने या मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. हास्यजत्रेच्या तुफान यशानंतर याच वेटक्लाऊडने गुलकंद या कौटुंबिक, विनोदी सिनेमाची निर्मिती केली आहे. हा त्यांचा पहिलाच सिनेमा असून तो १ मे पासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

याचे औचित्य साधून अभिनेते प्रसाद ओक, समीर चौघुले, सई ताम्हणकर, ईशा डे, सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी या दिग्गजांशी गप्पांचा कार्यक्रम दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने चिंचवड येथे आयोजित केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button