रेडिएंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेच्या वतीने 21 वे अखिल भारतीय प्रेरणा प्रतिभा संमेलन पार पडले
राजाभाऊ दुर्गे यांचा पुणे भुषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.


पिंपरी :रेडिएंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेच्या वतीने 21 वे अखिल भारतीय प्रेरणा प्रतिभा संमेलन रविवार दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत आचार्य अत्रे सभागृह संत तुकाराम नगर या ठिकाणी घेण्यात आले. या संमेलनात ” पुणे भुषण पुरस्कार 2025 ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवरायांचे अत्यंत विश्वासू सेनापती तानाजी मालुसरे यांचे वंशज कुणालजी मालुसरे यांच्या अध्यक्षते खाली पार पडलेल्या या पुणे भुषण पुरस्कार कार्यक्रमाचे पुरस्कार हे भारतीय सेनेचे निवृत्त सेनानी पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्या शुभहस्ते देण्यात आले.
कार्यक्रमासाठी डॉ विजय दहिफळे, डॉ कौशिक गायकवाड, डॉ पंढरीनाथ रोकडे, डॉ सुनील साळवे, डॉ गजानन रत्नपारखी, देहरादून येथून आलेल्या मिस इंडिया मिसेस बिंकल, डॉ रूपाली तसेच नागपूरचे श्री रवींद्र वैद्य आदी सर्वजण व्यासपीठावर उपस्थित होते.
राजाभाऊ म्हणतात, सामाजिक, राजकीय, आरोग्य विषयक जागृतीच्या तसेच सर्वात फिट, निरोगी आणि व्यायाम प्रेमी राजकारणी व्यक्तिमत्व या निकषांवर मला पुणे भुषण सन्मानाने गौरवण्यात आले.
या बद्दल राजाभाऊ दुर्गे स्वतः या संस्थेचा मनापासून ऋणी आहे.
व्यासपीठावर एकही राजकारणी व्यक्ती नसणाऱ्या या संस्थेच्या वतीने मला संपर्क साधून सदर पुरस्कारासाठी निमंत्रित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी संपुर्ण महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून आलेले नागरीक बंधू भगिनी प्रचंड संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था प्रमुख डॉ क्रांती महाजन यांनी केले. सूत्रसंचालन सौ सुनीता मॅडम यांनी तर आभार श्री पी एस कदम यांनी मानल.


