उद्योग विश्वक्रीडापिंपरी चिंचवड

हॉलीबॉल स्पर्धेत ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाला घसघशीत यश

आवाज कोणाचा प्रबोधिनीचा!

Spread the love

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत निगडी, प्राधिकरण येथील ज्ञान प्रबोधिनी विद्यालया संघाने दिघी येथील रामचंद्र विद्यालयाचा २५-१२, २५-१० असा २-० ने पराभूत करीत १७ वर्षांखालील गटात विजेतेपद प्राप्त केले. निगडीच्या सिटी प्राईड स्कूल संघाने तृतीय क्रमांक मिळविला.

पिंपरी-चिंचवड महापालिका व पुणे जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने स्पर्धा ज्ञान प्रबोधिनी विद्यालय येथे सुरू आहे. अंतिम फेरीत ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाकडून ऋषिकेश तेली, शौर्य काळोखे, रणवीर फलके यांनी उत्कृष्ट खेळकेला. तर पराभूत रामचंद्र विद्यालयाकडून आदित्य बेंद्रे, ईश्वर चव्हाण, सार्थक हांडे यांनी चांगली लढत दिली.

 

निगडीच्या सिटी प्राईड स्कूल संघाने चिंचवडच्या फत्तेचंद जैन विद्यालय संघाचा १५-६, १५-८असा पराभव केला. विजयी संघाकडून दर्श शेट्टी, चैतन्य देशपांडे, मणित गुप्ता यांनी उत्कृष्ट खेळ केला. पराभूत संघांचे ईशान माळी, पीयूष लांडगे, वेदांत भालेकर चांगले खेळले.

स्पर्धेत १४,१७ व १९ वर्षांखालील मुले व मुली गटांत एकूण २८५ संघांनी सहभाग नोंदविला आहे. तर, मुलीचा सामना एस एन बीपी हायस्कूल बरोबर रंगला होता. यात पण ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाचाच विजय झाला उत्कर्षा चव्हाण,अंजली चव्हाण, तनवी भोसले, साई श्री खोत यांनी विजय मिळवला.स्पर्धेचे उद्घाटन ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाचे केंद्रप्रमुख डॉ. मनोज देवळेकर व मुख्याध्यापिका विद्या उदास यांच्या हस्ते झाले. यावेळी स्पर्धाप्रमुख बन्सी आटवे, कबड्डी प्रशिक्षक भगवान सोनवणे, डॉ. अमृता लोखंडे, मोनिका माटे, शेखर कुलकर्णी, शंभू राजे, विजय लोंढे, प्रशांत उबाळे, वृषाली शिरसाट आदी उपस्थित होते. मोशीन बागवान, कर, सायली मॅडम, अनिकेत बद्दी, अथर्व कोरगांवकर, स्वाती ताई ढमाले, तुषार दादा, आकाश सोनवणे पंच म्हणून काम पाहिले. सुभाष जावीर यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button