मावळ लोकसभा मतदार संघात बारणे हॅट्रिक करणार कि वाघेरेना लॉटरी लागणार उत्सुकता शिगेला



:
पिंपरी :मावळ लोकसभा मतदार संघात लढावण्यात आलेल्या चुरशीच्या निवडणुकीत शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार श्रीरंग बारणे हॅट्रिक करतात की ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांना विजयाची लॉटरी लागणार.
चार जून रोजी दुपारी दोन नंतर विविध फेऱ्यांचे निकाल जाहीर होतील परंतु सध्या तरी बारणे समर्थक व वाघेरे समर्थक यांचाच उमेदवार असा दावा करतात
लोकसभा मतदार संघातील चिंचवड पनवेल पिंपरी विधानसभा मतदार संघातील मतदान विजयी उमेदवार ठरणार आहे
विशेषतः पिंपरी विधानसभेतील 16 झोपडपट्टीतील सुमारे एक लाख दहा हजार मतांची टक्केवारीपिंपरीतील एकूण मतदारसंघातील मतदारपेक्षा महत्वाची ठरणार आहे
खासंदार बारणे याच्या साठी मुख्यमंत्री शिंदेयांची शिवसेना, भारतीय जनता पार्टीतील विद्यमान आमदार अश्विनी जगताप, मावळचे माजी आमदार बाळा भेगडे, पनवेल चे प्रशांत ठाकूर, अपक्ष आमदार बाल्दी, पिंपरी -चिंचवड चे भाजपा अध्यक्ष शंकर जगताप पक्षाचे पदाधिकारी व महापालिकेचे माजी नगरसेवक आदिनी प्रयत्न केले.
चिंचवड, पनवेल, पिंपरी मतदार संघातील मतदारांचा कौल विजयी उमेदवार कोण ठरवणार आहे.मतदारसंघामध्ये केवळ ५२.२० टक्के मतदान झाले, २०१९ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक हे प्रमाण ५६.२९ टक्के होते. गेल्या पंचवर्षिकच्या तुलनेत हे प्रमाण चार टक्क्यांनी कमी आहे. अनेक मतदारांची नावे यादीतून गहाळ होणे, मृत मतदारांची नावे हटविली न जाणे, पोस्टल मतदानामध्ये आलेल्या त्रुटी अशा अनेक कारणांमुळे चिंचवडमध्ये मतदानाचा टक्का घसरला. मात्र, याशिवाय अनेक राजकीय गणितेही याला कारणीभूत ठरली. मात्र, या कमी झालेल्या मतदानाचा फटका कोणत्या उमेदवाराला बसणार याची चर्चा आता सुरू आहे.एकूण मतदान ५४.८७ टक्के
चिंचवड विधानसभा मतदारसंघात नेहमीच भाजपचे वर्चस्व राहिलेले आहे. मावळ लोकसभेची ही जागा भाजपला मिळावी, अशी येथील भाजप पदाधिकाऱ्यांची इच्छा होती. मात्र, ही उमेदवारी महायुतीतील शिवसेना पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे यांना देण्यात आली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने उद्धव बाळासाहेब ठाकरे ‘यांच्या शिवसेनेचे उमेदवार संजोग वाघेरेही पिंपरी चिंचवडमधील स्थानिक होते. बारणे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याने शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. तर ही जागा भाजपला न मिळाल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही बारणेंच्या प्रचारामध्ये हात आखडता घेतल्याची चर्चा झाली. चिंचवड मतदारसंघातील बहुतांश भागामध्ये बारणे यांना प्रचारादरम्यान पोचता आले नाही. दुसरीकडे वाघेरे हे अनेक वर्षे राष्ट्रवादीत असल्याने तेथील जुन्या लोकांचाही पाठिंबा मिळाला. मतदारसंघात सकाळपासूनच नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. मात्र, मोबाईल बंदीबाबत नागरिक अनभिज्ञ होते. जे नागरिक ओळखपत्र न बाळगता मोबाईलमधील डिजी लॉकरमधील ओळखपत्रावर अवलंबून होते. अशा मतदारांना परत घरी जावे लागले. तसेच वर्षानुवर्षे मतदान करणाऱ्यांचीही नावे मतदारयादीतून वगळण्यात आली होती. पत्ता बदललेल्या नागरिकांची नावे यादीत नव्हती. त्यामुळेही दहा टक्के मतदार मतदानापासून वंचित राहिल्याचे सांगण्यात येत होते. सकाळच्या तुलनेत दुपारी मतदान कमी झाले. खरे ओळखपत्र नसल्याने घरी गेलेले नागरिकही परत फिरकलेच नाहीत.
संजोग वाघेरे यांच्या प्रचारात अगदी शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरे यांची सभा झाल्याने वातावरण तयार झाले होते. तर बारणे यांच्या प्रचाराच्या समारोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोड शो करून शक्तीप्रदर्शन केले. श्रीरंग बारणे यांनी यांनी ठाकरे यांची साथ सोडल्याने कट्टर शिवसैनिक नाराज होते. सर्वच विधानसभा मतदारसंघात तुलनेने कमी मतदान झाल्याने त्याचा फटका कोणाला बसणार हे चार जून रोजीच उघड होईल२०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत तीन टक्क्यांनी कमी आहे. मात्र, मतदारांची वाढीव संख्या लक्षात घेता यावेळचे एकूण मतदान हे गेल्या निवडणुकीएवढेच म्हणजे सुमारे दोन लाख दहा हजारांच्या घरात आहे. कडक उन्हाळा व सायंकाळी काही भागात झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाला. दुसरी बाब म्हणजे बहुतांशी मतदार हे मतदानासाठी स्वतःहून मतदान केंद्रावर आलेले होते. स्थानिक स्वराज्य संत्यांना आग्रह करून मतदानासाठी आणलेले नव्हते.दोन्ही उमेदवारांची भिस्त ही पक्षांवर अवलंबून असल्याने त्यांची स्वतःची जास्तीत जास्त मतदान करून घेण्यास कमी पड स्थानिक (मावळ तालुक्यातील) उमेदवार नस तालुक्यात शेवटपर्यंत निवडणुकीचा म्हणावा माहोल तयार झालेला दिसला नाही. गाव पातळी घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपा परीने प्रचारात सहभागी दिसले. शहरी भागात यांच्या प्रचारासाठी झालेली उपमुख्यमंत्री पवार यांची सभा वगळता दोन्ही बाजूकडून पातळीवरील कोणतेही मोठे नेते प्रचारासाठी आले नाहीत. कमी कालावधीमध्ये दोन्ही उमेदवार प्रत्येक गावात प्रचारासाठी पोहचू शकले या बाबीचाही परिणाम मतदानाची टक्केवारी कमी होण्यात झाला. आता झालेल्या मतदानात मत कोणाला मिळणार याबाबत मोठी उत्सुकत महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही बाजू कडील पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातून आघाडी मिळण्याचा दावा केला आहे.



