पिंपरी चिंचवडमावळराजकीय

मावळ लोकसभेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

मावळ मतदारसंघात १६ संवेदनशील मतदान केंद्रे

Spread the love

पिंपरी: मावळ लोकसभा मतदासंघाकरीता सोमवार १३ मे रोजी मतदान होत असून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची पूर्ण तयारी झाली आहे. ही मतदान प्रक्रिया मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात आणि शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी आकुर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

मावळ लोकसभा मतदार संघातील मतदार संख्या, मतदान यंत्रांची आकडेवारी, मतदान केंद्राच्या ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा, टपाली मतदानाची आकडेवारी, आचारसंहिता कालावधीत केलेली कारवाई, संवेदनशील तसेच विशेष मतदान केंद्रांची माहिती, मतदान प्रक्रियेसाठी नेमण्यात आलेल्या मनुष्यबळाची माहिती, गृहमतदानाची आकडेवारी, आदर्श मतदान केंद्रांची माहिती, वाहतूक आराखडा तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर असलेल्या विविध निर्बंध आणि त्याबाबतच्या नियमावलीबाबत दीपक सिंगला यांनी सविस्तर माहिती दिली. मावळ मतदारसंघात एकूण १६ संवेदनशील मतदान केंद्रे असून या मतदान केंद्रावर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी पुणे ग्रामीणचे उपविभागीय पोलीस उप अधीक्षक सत्य साई कार्तिक, मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे निवडणूक समन्वय अधिकारी प्रवीण ठाकरे, हिंमत खराडे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहायक पोलीस आयुक्त सतीश माने, निवडणूक समन्वयक अभिजित जगताप, निवडणूक सहाय्यक सचिन मस्के आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button